पवनार नगरीत पार पडला सर्वोदय मेळावा;ओम शांतीच्या गजराने राष्ट्रपिता महात्मा गांधींना नागरिकांनी केले अभिवादन
वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):- दि.12 फेब्रुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनामित्य पवनार नगरीत सर्वोदय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात गावातील तसेच इतर भागातील नागरिकांनी यावेळी उस्फूर्त प्रतिसाद दिला.गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारिमुळे या आयोजनात खंड पडला होता त्यामुळे गावातील नागरिक व इतर भागातील नागरिकांना या पासून वंचित राहावे लागले होते.मात्र पहाटे पासून यात्रेसाठी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपले दुकान थाटले असून सकाळी सात वाजता गीताईचे पठण झाले.त्याच बरोबर ओम शांतीच्या गजराने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करण्यात आले.या ब्रम्हविद्या मंदिरातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते,त्या मुळे परिसरात वातावरण भक्तिमय निर्माण झाले.पवनार नगरी हि संताची पावन नगरी असून या वेळेस कान्हापूर,मोरचापुर,वैतपुर, रमणा,सेलू,रेहकी,सूर्गाव, केलझर,वर्धा,वरूड,सेवाग्राम व इतर परिसरातील नागरिकांनी या मेळाव्याला हजेरी लावली असून नागरिकांना धाम नदी तीरावर असलेल्या कचा, चीवडा,कुल्फीचा मोह आवरता आला नसल्याचे दिसून आले.आज दुपारी चार वाजे पासून तर रात्री आठ वाजे पर्यंत हि एकदिवसीय यात्रा असून पवनार ग्रामस्थांसह इतर भागातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने यात्रेत नागरिकांसह महीलाची सध्या चांगलीच गर्दी दिसून आली.भोंग्याच्या कर्कश आवाजाने पूर्ती शांतता भंग झाली मात्र हीच खरी यात्रा असल्याचं बोलत असून सर्वदूर राष्ट्रपिता महात्मा गांधींची यात्रा म्हणून ओळखल्या जाते तीस जानेवारी 1948 हा भारतातील काळा दिवस असल्याचं सांगण्यात येत आहे.परंतु धाम नदीतील डोहात त्यांच्या राखेचे विसर्जन करून त्याच दोहा जवळ त्यांची समाधी स्थापन करण्यात आली त्या मुळे आजचा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिवस म्हणून मानला जात असल्याचं ब्रम्ह विद्या मंदिरातील तसेच पवनार नगरीतील नागरिक बोलत असल्याचं दिसून येतं आहे.