कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार कलाशिक्षक दत्तात्रय आडेप यांना प्रदान
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ फेब्रुवारी):-गंगापूर प्रशालेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय आडेप सर यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार (2023 ठाणे) मिळाला आहे.दत्तात्रय आडेप सर हे अहमदनगर मधील रहिवासी असून त्यांचे कलाक्षेत्रामध्ये जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान झाला आहे असे मत ज्येष्ठ चित्रकार भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केले.मा.ना.किसन कथोरे,श्री.निरंजन डावखरे पदवीधर आमदार कोकण विभाग,श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आमदार,यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.