Maharashtra247

जिल्ह्यातील प्रसिध्द विधिज्ञ ॲड.संदिप डापसे यांचे दुःखद निधन

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ फेब्रुवारी):-शहरातील सावेडीगाव येथील रहिवासी तथा जिल्ह्यातील प्रसिध्द विधिज्ञ ॲड.राजुभाऊ उर्फ संदिप डापसे यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांचे वय ४८ वर्ष होते.त्यांच्यामागे आई, भाऊ,पत्नी,मुलगा,मुलगी व चुलते,पुतणे असा मोठा परिवार आहे.ते अहमदनगर कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.सतत हसतमुख असलेले अ‍ॅड. संदिप डापसे हे अहमदनगर परिसरात राजूभाऊ नावाने परिचित होते.एमआयडीसी कामगारांच्या बाजूने ते हक्काने न्यायासाठी लढत असत.त्यांच्या जाण्याने शहर व सावेडी उपनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page