स्वच्छतेचा संकल्प..सुंदर अहिल्यानगराचा संकल्प..!सक्कर चौक ते कोठी रोड परिसरात स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आमदार जगताप स्वच्छतेसाठी सकाळीच रोडवर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर स्वच्छ,सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.जोपर्यंत आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आज सक्कर चौक ते कोठी रोड परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेण्यात आला.अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.आयुक्त श्री. यशवंत डांगे,माजी उपमहापौर गणेश भोसले,उपायुक्त संतोष टेगळे,माजी नगरसेवक प्रकाश भगानगरे,संजय चोपडा,विपुल शेटीया,कमलेश भंडारी,उद्यान प्रमुख शशिकांत नजन,घनकचरा प्रमुख अशोक साबळे,तसेच विशाल पवार,मळू गाडळकर, तात्या दरेकर,गोरख पडोळे आदी अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, घरगुती कचरा घंटागाडीतच टाकावा,उघड्यावर कचरा टाकू नये आणि आपल्या शहराच्या स्वच्छतेत सक्रिय भूमिका बजवावी.स्वच्छतेच्या या मोहिमेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता,अहिल्यानगरला “स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर” बनविण्याचा संकल्प आता खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनताना दिसत आहे.
