Maharashtra247

पोलिसाची गाडी दिली पेटवून जिल्ह्यातील घटना

 

संगमनेर प्रतिनिधी(दि.१३ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.गाडीला आग लागली की गाडीला जाणीवपूर्वक आग लावली याबाबत पोलीस चौकशी करीत आहे.शेताच्या बांधावरील गवत पेटवल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली.संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात शनिवारी ता.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, घारगाव परिसरात राहणार्‍या जगदीश नानाभाऊ आहेर याने काल 1.30 वाजेच्या सुमारास त्याच्या मालकीच्या शेताच्या बांधावर उगलेले व वाळलेले गवत पेटवून दिले. कोणतीही खबरदारी न घेता तो तेथून निघून गेला.दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केले.या ठिकाणी कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांची मारुती सुझकी कंपनीची वॅगनर गाडी (क्रमांक एम एच 14 बी आर 727) ही गाडी उभी होती. आगीच्या ज्वालामुळे प्लास्टीक शेडनेटने पेट घेतला.यामुळे चव्हाण यांच्या गाडीला आग लागली.या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.याबाबत पोकॉ/ प्रमोद चव्हाण यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदिश नानाभाऊ आहेर (रा.घारगाव,ता.संगमनेर) याच्या विरुद्ध गुरनं/ 66/2023 भादंविक/285 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोना/आर.ए.लांघे करत आहे.

You cannot copy content of this page