महिलांच्या हक्कासाठी नव्या संघटनेचा उदय..स्वातीताई धाईंजे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात!..उद्या होणार संघटनेच्या नावाची अधिकृत घोषणा
अकलूज (प्रतिनिधी):-महिलांच्या न्याय,सन्मान आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या स्वातीताई धाईंजे यांनी आज बचत गटातील महिलांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिलांच्या प्रश्नांसाठी एक नवीन सामाजिक संघटनेची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.ही बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.बैठकी दरम्यान महिलांनी समाजात वाढत असलेल्या अन्याय, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या घटकांवर सविस्तर चर्चा केली.

स्वातीताई धाईंजे यांनी या बैठकीत महिलांच्या न्यायहक्कासाठी ठोस भूमिका मांडली आणि “महिलांनी आता एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे,” असे सांगून नवीन संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली.ही संघटना महिलांच्या प्रश्नांवर काम करणार असून उद्या दि.११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता या संघटनेचे अधिकृत नाव जाहीर करण्यात येणार आहे.या बैठकीला किरणताई खंडागळे,सुवर्णा पांचाळ, ललिताताई चौगुले,शिलाताई बिसे,आसमा तांबोळी,रिहाना कुरेशी,शिरीन कुरेशी, फातिमा कुरेशी,सकीना तांबोळी,सारा तांबोळी,आमिना तांबोळी, मैनाताई गायकवाड, दिपाली चंदनशिव,आश्विनी धाईंजे,रेखा लोखंडे,रेश्मा धाईंजे,उज्वला चौगुले यांसारख्या अनेक महिला उत्साहाने उपस्थित होत्या.या बैठकीच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला असून,उद्या होणारी संघटनेची घोषणा शहरातील महिला चळवळीस नवी दिशा देणार, अशी चर्चा सुरू आहे.
