अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर एलसीबीचे छापे सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ फेब्रुवारी):-नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 06 आरोपी विरुध्द कारवाई करुन 1,92,000/- (एक लाख ब्यान्नव हजार) रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने 3,400 लिटर कच्चे रसायन व 220 लिटर तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नाश केले आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/बबन मखरे,पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,संदीप घोडके, शंकर चौधरी,पोकॉ/मच्छिंद्र बर्डे,रविंद्र घुंगासे,रोहिदास नवगिरे,मपोना/भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.10/02/23 ते दि.12/02/23 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवुन 06 ठिकाणी छापे टाकुन एकुण 1,92,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 3,4000 लि. कच्चे रसायन, 220 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त व नाश करुन खालील प्रमाणे 06 आरोपीं विरुध्द नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1.नगर तालुका 117/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) (क) (ड) 1) अशोक ईश्वर पवार रा.खडकी, ता. नगर 20,000/- रु.किचे 400 लि.कच्चे रसायन 3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु
2.नगर तालुका 118/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) (क) (ड) 1) रविंद्र ईश्वर पवार रा. खडकी, ता. नगर 10,000/- रु.किचे 200 लि. कच्चे रसायन 3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु
3.नगर तालुका 123/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) (क) (ड) 1) रौफ मेहबुब सय्यद, रा. नेप्ती, ता. नगर 60,000/- रु.किचे 1200 लि. कच्चे रसायन 7,000/- रु.किची 70 लि.तयार दारु
4.नगर तालुका 124/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ) (क) (ड) 1) भरत माणिक पवार रा. नेप्ती, ता. नगर 50,000/- रु.किचे 1000 लि. कच्चे रसायन 3,000/- रु.किची 30 लि.तयार दारु
5.भिंगार कॅम्प 97/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) 1) नवनाथ लक्ष्मण लोणारे रा. कासारमळा, कापुरवाडी, ता. नगर 20,000/- रु.किचे 400 लि.कच्चे रसायन 3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु
6.भिंगार कॅम्प 99/2023 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) एक महिला आरोपी 10,000/- रु.किचे 200 लि.कच्चे रसायन 3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु
एकुण 5 पुरुष
1 महिला
1,92,000/- रु. कि.ची 3,400 लिटर कच्चे रसायन 220 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व साधने
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग व श्री.अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.