✝️ फिलाडेल्फिया चर्चमध्ये बालदिन उत्सव रंगला;मुलं ही देवाची अनमोल देणगी असून त्यांच्या जीवनात योग्य संस्कार देणे हे प्रत्येक आई-वडिलांचे मुख्य कर्तव्य-रेव्ह.दुसाने
केडगाव (प्रतिनिधी):-दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी फिलाडेल्फिया चर्चमध्ये बालदिन उत्सव मोठ्या उत्साहात आणि अध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच चर्च परिसरात आनंदी वातावरण पसरले होते.बालकांसाठी विशेष प्रार्थना,स्तुती-स्तवन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रात रेव्ह.दुसाने यांनी पालकांच्या कर्तव्यावर अतिशय निरागस आणि परिणामकारक भाषण केले.“मुलं ही देवाची अनमोल देणगी असून त्यांच्या जीवनात योग्य संस्कार देणे हे प्रत्येक आई-वडिलांचे मुख्य कर्तव्य आहे” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात जयाताई काळभोर यांच्या हस्ते चर्चमधील बालिकांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले,तर श्रीकांत काशीकर यांच्या हस्ते बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या.भेटवस्तू घेताना मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य,उत्साह आणि आनंदाचे भाव उपस्थितांचे मन जिंकून गेले.

यानंतर मंडळीतील विविध सदस्यांनी स्वतःच्या मुलांमुळे देवाने त्यांच्या जीवनात कसे आशीर्वाद दिले याविषयी मनोगत व्यक्त केले.कुटुंबातील एकता,प्रेम आणि श्रद्धेने परिपूर्ण असे अनुभव ऐकताना सभागृहात भावनिक आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाची सांगता सर्व मंडळींनी एकत्र येऊन घेतलेल्या स्नेहभोजनाने झाली.प्रेम,बंधुता आणि परमेश्वराच्या कृपेची अनुभूती देणारा हा बालदिन उत्सव मनाला स्पर्शून जाणारा ठरला.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रवीण सिरसाट, सागर काशीकर आणि अतुल प्रकाशाळे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.त्यांची मेहनत, समन्वय आणि सेवाभावामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
