राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! गोवा बनावट विदेशी दारू विक्री करणारा गजाआड..

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व गोवा राज्यात विक्रीस असलेली विदेशी दारू अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र.1 अहिल्यानगर विभागाने पारनेर तालुक्यात मोठी कारवाई केली.खडकवाडी शिवारातील हॉटेल साईराज येथे ही धाडसी कारवाई करण्यात आली.अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने व उपअधीक्षक श्री.प्रविण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.अवैध दारू विक्र प्रकरणी एक गुन्हा नोंदविण्यात आला असून,आरोपी स्वप्नील पांडुरंग काशिद याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत गोवा राज्यात विक्रीस असलेली परंतु महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी दारू एकूण 72 ब.ली (36 पेट्या – 2000 मिली प्रत्येक) असा सुमारे ₹87,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.या ऑपरेशनमध्ये निरीक्षक श्री.एस.आर.कुसळे,दुय्यम निरीक्षक श्री.ए.एन.जावळे तसेच जवान सुरज पवार,चतुर पाटोळे, सुनील निमसे,सिद्धांत गिरीगोसावी व महिला जवान अर्चना दहिफळे यांनी विशेष सहभाग नोंदविला.
उत्पादन शुल्क विभागाने जनतेस आवाहन केले आहे की, अवैध मद्य निर्मिती,वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 2339 999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.
