देवगड विद्यालयात मुलीच्या वाढदिवसाला शालेय साहित्याची भेट..”तेजस्विनी” च्या वाढदिवसानिमित्त विशाल भालेराव यांचा सामाजिक उपक्रम..
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं ते जोरदार सेलेब्रेशन,केक कापून एकमेकांच्या तोंडावर फासणे, डिजे लावून पार्टी इतर असे अनेकदा आपल्या सभोवती वाढदिवस होतांना दिसत असतात.

परंतु आपल्या मुलीचा जन्मदिवस हा काहीतरी समाजोपयोगी उपक्रम राबवून व विद्यार्थ्यांसोबत साजरा करावा अशी योजना मनाशी आखून हिवरगाव पावसा येथील विशाल भालेराव यांनी मुलगी तेजस्विनी विशाल भालेराव हिच्या वाढदिवसानिमित्त देवगड माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 5 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन सामाजिक बांधीलकी जपात आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम राबवला आहे.तेजस्विनी विशाल भालेराव हिच्या वाढदिवसाला शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करुन एकप्रकारे तिला सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे बक्षीस दिले असल्याची भावना यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उगले मॅडम यांनी व्यक्त केली.विशाल भालेराव यांच्या सामाजिक उपक्रमाचे विद्यालयच्या मुख्याध्यापिका श्रीमती उगले मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि आभार व्यक्त केले.यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
