सात ते आठ गुन्हे दाखल असलेल्या अंबादास उर्फ अमोल वाघ ची दहशत संपवा..! वारंवार धमक्या,मानसिक त्रास आणि खोट्या फिर्यादींमुळे युवक त्रस्त..सोशल मीडियावर खोटी बदनामी करून समाजात प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न..वाघ ला तात्काळ अटक करा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार..
फुलारी व शिंदे कुटुंबीयांची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील राहूल बाळासाहेब फुलारे या तरुणाने अमोल उर्फ अंबादास किसन वाघ यांच्या विरोधात गंभीर आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे.

अमोल उर्फ अंबादास वाघ हा गेल्या कित्येक दिवसांपासून सतत मानसिक छळ,शिवीगाळ, जीवघेण्या धमक्या देत असल्याचे फुलारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.राहुल फुलारे यांचा आरोप आहे की,अमोल उर्फ अंबादास वाघ हा अनेकांना आर्थिक व्यवहाराच्या जाळ्यात अडकवून आर्थिक फसवणूक करतो. व त्याला पैसे परत मागितल्यास मी आत्महत्या करून तुमचे नाव सुसाईड नोट मध्ये लिहून तुम्हाला जेलमध्ये पाठवीन अशी धमकी देतो. अमोल यांना फिर्यादी राहुल फुलारे यांनी दिलेले नऊ लाख रुपये परत मागितल्यावर “तुला गावात राहू देणार नाही”, “तुझे नाव बदनाम करेन”, “तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन” अशा धमक्या देत आहे. इतकेच नव्हे तर,सोशल मीडियावर खोटी बदनामी करून समाजात प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न देखील अमोल वाघ याने केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही अमोल उर्फ अंबादास याने घरातून निघून गेल्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यात खोटी मिसिंग तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता तो मुद्दाम लपून बसल्याचे स्पष्ट झाल्याचे अर्जदाराने सांगितले. लोकांकडून फसवणुकीच्या उद्देशाने धमकावणे,खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, महिलांच्या माध्यमातून वाद निर्माण करणे अशा अनेक गंभीर आरोपांचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.घटनेची गंभीरता लक्षात घेता,अर्जदाराने गैरतक्रारदार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अमोल उर्फ अंबादास वाघ याच्यावर यापूर्वीही कलम 138 सह विविध प्रकरणांमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून अद्यापही त्याला या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले नाही.वॉरंट असतानाही अंबादास वाघ कुटुंबासोबत आमरण उपोषणास बसला व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा अमोल उर्फ अंबादास वाघ चा दहशतीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.तरी लवकरात लवकर या अमोल उर्फ अंबादास वाघ याला अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी फुलारे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
