सामान्य जनतेचा बुलंद आवाज अरुणाताई लांडगे वार्ड क्र.६ मधून रणांगणात!परिवर्तनाच्या लढ्याची नवी सुरुवात..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ६ येथे राजकीय समीकरणांना वेग आला असून शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा आणि क्षेत्रातील परिचित सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई लांडगे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून दमदार पाऊल उचलले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज बुलंद करणाऱ्या तसेच अत्याचारित महिलांच्या न्यायासाठी अनेक आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्या लांडगे यांची लोकप्रियता वार्डात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
काँग्रेसच्या विविध पदांवर काम करत असताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. महिलांवरील अत्याचार,जलप्रश्न, स्वच्छता,अंगणवाडी आणि शालेय सुविधांचे प्रश्न,तसेच नागरी सोयी-सुविधांबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनामुळे त्या सतत चर्चेत राहिल्या आहेत.वार्डातील नागरिकांमध्ये त्यांचा सातत्याने संपर्क, प्रामाणिकपणा आणि लढाऊ बाणा यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, विशेषत: महिला आणि तरुणांमध्ये त्यांना मजबूत पाठबळ लाभत आहे. सामाजिक न्यायाची भक्कम भूमिका आणि सामान्यांच्या प्रश्नांवर तडफदार आवाज हे त्यांचे मुख्य बळ मानले जाते.स्थानिक पातळीवरील नागरी समस्यांवर उपाययोजना, पायाभूत सुविधांचा विकास, महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम, तसेच अत्याचारितांसाठी कायदेशीर मदत व मार्गदर्शन यासारख्या विषयांवर त्यांनी भरीव काम केले असून आगामी निवडणुकीत त्यांनी विकासाचा दमदार आराखडा मांडण्याची तयारी सुरू केली आहे.वार्ड क्रमांक सहा मध्ये अरुणा लांडगे यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीची हवा तापण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. जनता बदलाची अपेक्षा करत असून, “लढाऊ, कार्यक्षम आणि जनतेच्या बाजूने उभे राहणारे नेतृत्व” अशी त्यांची ओळख अधिक मजबूत होत आहे.
