डिजिटल आनंदाचा सोहळा! ताराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या मेळाव्यात तब्बल 45 हजारांची डिजिटल उलाढाल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात आयोजित बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थिनी विक्रेते बनत खरेदी विक्रीचा अनुभव घेत.ऑनलाईन डिजिटल बाजारात पंचेचाळीस हजाराची उलाढाल झाली.पाणीपुरी,पापडभाजी,वडापाव,भेळ,समोसे, मसाला ताक,चकली,पापडी चाट,ढोकळा,लिंबू शरबत, इडली चटणी, गुलाब शरबत, लस्सी,डाळीचे लाडू, पावभाजी, नुडल्स,मेदु वडा, आप्पे, हरभरा उसळ चाट,रसना, फ्रुट स्टॉल, पॅटीस, ज्वारीची खिचडी, चीज सँडविच, गुलाबजाम , शालेय परसबागेतील भाजीपाला,खेळणी इत्यादी पदार्थांचे स्टॉल विद्यार्थिनीनि पालकांच्या मदतीने लावले होते.शिक्षकांच्या मोबाईल द्वारे सर्व व्यवहार गुगल व फोन पे द्वारे करण्यात आले.यावेळी उपस्थित पाहुणे,विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी विद्यार्थिनीच्या स्टॉलवर भेट देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया सुबे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बबनराव कोतकर होते.कार्यक्रमाचे पाहुणे उदयोजक दौलतराव शिंदे हे होते.संस्थेचे संचालक जयद्रथ खाकाळ, खजिनदार प्रल्हाद साठे, सहसचिव रावसाहेब सातपुते,सोनवणे राजेश,संजय निक्रड,मुख्याध्यापीका वासंती धुमाळ सर्व शिक्षक,शिक्षिका, कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थिती होते.विद्यार्थिनीना खरेदी-विक्री,नफा-तोटा समजावा, विद्यार्थिनीचे व्यावहारिक ज्ञान वाढावे, गतीने आकडेमोड करता यावी,नाणी-नोटा ,व डिजीटल पद्धतीचा व्यवहार समजावा म्हणून शाळेत दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असते मुख्याध्यापीका वासंती धुमाळ यांनी सांगितले.महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात दुर्बल घटकातील विद्यार्थिनीना विविध प्रकारच्या कौशल्यांचे शिक्षण या वयातच दिले जाते.याचा विशेष आनंद आहे.तसेच शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात.शिक्षकांच्या अथक परिश्रमाने शाळेच्या विद्यार्थिनी घडत आहेत.
हे डिजिटल युग आहे.या आनंद मेळाव्यात डिजिटल पेमेंट पद्धतीने केले पाहिजे.यामधून आर्थिक व्यवहार समजण्यासाठी मदत होईल. कन्या विद्यालयातची ओळख जिल्ह्यातच नाही तर राज्यात होईल असे उद्योजक दौलतराव शिंदे आपल्या मनोगतात म्हटले.आज आपल्या आनंदाचा दिवस आहे. खुप आनंद घ्या परंतु अभ्यास कडे दूर लक्ष करू नका असे प्रतिपादन संस्थेचे सचिव बबनराव कोतकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रम चे सुत्रसंचालन भारती गुंड यांनी केले.आभार जयश्री कोतकर यांनी मानले.
