क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने औरंगपुरा येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.सामाजिक न्याय, समानता आणि प्रबोधनाचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, “फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.स्त्री-शिक्षण आणि शेतकरी कल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे.
”यानंतर जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांच्या विचारांवर चालण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी म्हटले की, “महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”कार्यक्रमाला मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा कार्याध्यक्ष जयनाथ बोर्डे,ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, दिलीप कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
