जनतेचा विश्वास विकासाची लाट प्रभाग क्र.४ मध्ये लक्ष्मीताई ताठेंना मिळतोय प्रचंड प्रतिसाद
नाशिक (प्रतिनिधी):-शहरातील पंचवटीतील अतीसंवेदनशील परिचित परिसर म्हणून फुले नगर, मायको दवाखाना,तारवाला नगर, तलाठी कॉलनी व महालक्ष्मी टॉकीज अशा अतिशय महत्त्वाच्या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.येथून सामाजिक कार्यकर्त्या विवेक फाउंडेशनच्या अध्यक्षा व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख लक्ष्मीबाई ताठे या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत.या प्रभागात विविध पक्ष-गटांकडून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार मैदानात उतरत असून, परंतु लक्ष्मीताई ताठे यांचा या प्रभागात चांगला सामाजिक कामात दबदबा आहे.
आताच्या घडीला सर्वच पक्षांचे नेते,कार्यकर्ते आणि इच्छुकांनी घर-दारी संस्कार मोहीम सुरू केली आहे.महिला सबलीकरणाची ज्योत पेटवणाऱ्या लक्ष्मीताई ताठे यांनी सामाजिक,राजकीय,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात भक्कम योगदान देऊन प्रभागातील विकासकामांतही पुढाकार घेतला आहे.प्रभागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या ओळखून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवणाऱ्या व सामाजिक न्यायासाठी लढा देणाऱ्या लक्ष्मीताई ताठे यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक, राजकीय,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या तसेच दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रस्थानी राहणाऱ्या ताठे यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला आहे.स्थानिक तसेच परिसरातील अनेक महिलांना कौटुंबिक हिंसा, छळ,फसवणूक,अन्याय अशा विविध प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महिलांसाठी तक्रार निवारण, मार्गदर्शन तसेच सल्लामसलतीची यंत्रणा उपलब्ध करून देत त्यांनी महिलांच्या मनात धैर्याची भावना रुजवली.गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कांसाठी त्या कायम सक्रिय राहिल्या. परिसरातील शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा आणि युवा मार्गदर्शन शिबिरांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन,सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना, सामाजिक एकतेसाठी उपक्रम राबवणे,परंपरा जपत नवसंस्कृतीचे स्वागत करणे—या सर्व माध्यमातून ताठे यांनी परिसरात ऐक्याची भावना बळकट केली.फूटपाथ दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्थेची सुधारणा, रस्ते काँक्रीटीकरण, स्ट्रीटलाईटची उभारणी, स्वच्छता सुधारणा, उद्यान विकास, गर्दी असलेल्या भागांत वाहतूक नियोजन— अशा अनेक विकासकामांसाठी ताठे यांनी पुढाकार घेत निवेदन, पाठपुरावा आणि ठाक-ठोक भूमिका घेतली.साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, लोकसंग्रह आणि समस्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याची शैली यामुळे त्या प्रभागातील नागरिकांमध्ये विशेष पसंती मिळवून आहेत. सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि लोकांचा विश्वास जपणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.लक्ष्मीताई ताठे यांचे सर्वसमावेशक कार्य आणि जनसेवा हाच त्यांचा खरा प्रवास आहे.सामाजिक बांधिलकी, जिद्द आणि काम करण्याची उमेद—यामुळे त्या आज प्रभागातील महिलांसह सर्वच नागरिकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
