सहयोग म्हणजे केवळ मदत नाही तर आपल्या विचारांना दिलेला हात..भिमराज सेनेचा मोठा उपक्रम..! ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनासाठी महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांचे समाज बांधवांना मदतीचे अवाहन
मुंबई (प्रतिनिधी):-घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 व 6 डिसेंबर निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत भिम अनुयायांसाठी विविध उपक्रम राबविण्याची घोषणा भिममराज सेना महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांनी केली आहे. “आपल्या बांधवांसाठी आपण आहोत” या भूमिकेतून समाजघटकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाची गौरवशाली परंपरा – सामाजिक सेवेसाठी हातात हात
गत अनेक वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो अनुयायी चैत्यभूमी,उपनगर,तालुका ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.या पार्श्वभूमीवर कोणालाही अडचण येऊ नये, कोणालाही उपासमार,तहान, किंवा आरोग्याशी संबंधीत तातडीची गरज निर्माण झाल्यास मदत मिळावी,या हेतूने हा उपक्रम सातत्याने राबविला जातो.
समाज बांधवांसाठी सेवा सामग्रीचे वाटप
यंदाही खालील सामग्रीचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात येणार आहे बिस्कीट पाकीट,पाण्याच्या बाटल्या,स्नॅक्स/नाश्ता,फळे,महिलांसाठी सेनेटरी पॅड तसेच अत्यावश्यक साहित्य,जयाताई बनसोडे यांनी समाजातील सर्व बांधवांना मनापासून योगदान देण्याचे प्रबळ आवाहन केले आहे.
सहकार्याची हाक आर्थिक मदतीचेही स्वागत
या उपक्रमासाठी साहित्यिक मदत तसेच आर्थिक मदत देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 आर्थिक सहयोगासाठी GPay नंबर : 8104516065
📌 जयाताई बनसोडे-भिमराज सेना महाराष्ट्र प्रमुख
⭐ “सहयोग म्हणजे केवळ मदत नाही, तर आपल्या विचारांना दिलेला हात” – जयाताई बनसोडे
“बाबासाहेबांनी दिलेल्या मानवी मूल्यांवर उभे राहून भुकेल्याला अन्न, तहानलेल्या यात्रेकरूला पाणी, महिलांना स्वच्छता सुविधा देणे हा आपला धर्म आहे. जे शक्य असेल तेवढे योगदान द्या; एक छोटी मदतही मोठा आधार बनते,” असे जयाताई बनसोडे यांनी सांगितले.
समाजातील एकतेचा अनोखा संदेश
महापरिनिर्वाण दिन हा केवळ श्रद्धेचा दिवस नसून सेवेचे, बांधिलकीचे आणि समानतेच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजातील एकोपा, संवेदनशीलता आणि बाबासाहेबांवरील निष्ठेची जाणीव अधिक दृढ करणारा ठरत आहे.
