आंतरजातीय विवाहातील जातीय हत्येवर रिपब्लिकन सेनेची आक्रमक भूमिका..!सक्षम ताटे कुटुंबाला आंबेडकर परिवाराचा थेट पाठिंबा न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही जिल्हाध्यक्षा प्रेमिलाताई वाघमारे
नांदेड (प्रतिनिधी):-आंतरजातीय विवाहातून उद्भवलेल्या जातीय हत्येच्या भीषण प्रकरणात रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा टीमने सक्षम ताटे (इत्वारा,नांदेड) यांच्या घरी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले.या भेटीत एक महत्त्वाची घडामोड घडली सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सक्षम ताटे यांच्या आईशी थेट फोनवर संवाद साधत त्यांना ‘आंबेडकर परिवार पूर्णपणे आपल्या सोबत आहे’,अशी ठाम दिलासा देणारी भूमिका स्पष्ट केली.

या प्रकरणावर सरसेनानींनी कठोर भूमिका घेत रिपब्लिकन सेनाच्या वतीने नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार प्रतिनिधी मंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आठ आरोपींना झालेल्या अटके बाबत,तपासाच्या गतीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिये संबंधी सविस्तर चर्चा केली.रिपब्लिकन सेनाने अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट मागणी केली की,ही घटना जातीय द्वेषातून घडलेली हत्या असून, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा.संघटनेने यावेळी प्रशासनास इशारा देत सांगितले की,न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन सेना मागे हटणार नाही.
या महत्वाच्या दौऱ्यात रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ सिरसे,महाराष्ट्र नेते व जिल्हा प्रभारी माधव दादा जमदाडे,नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ सोनसळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेमिलाताई वाघमारे,रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश सावते,जिल्हा महासचिव द.शंकर थोरात, मधुकर झगडे,प्रशांत कांबळे, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष द.उत्तर, सचिव डॉ.प्रेम व्यवहारे,उमरी तालुका अध्यक्ष कुलदीप वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या भेटीमुळे सक्षम ताटे कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला असून,या प्रकरणात रिपब्लिकन सेना आक्रमक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
