क्राईमचा नवा ट्रेंड गावठी पिस्तूल ची ऑनलाईन डील..कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई..खरेदीदार–विक्रेता दोघेही गजाआड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास व त्याला गावठी पिस्तूल विकत देणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात यश आले आहे.या मोठ्या कारवाईची माहितीस दि. 05/12/2024 रोजी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाल्यानंतर तातडीने तपास पथक सक्रिय झाले.एक इसम आपल्या सोबत गावठी पिस्तूल घेऊन आयुर्वेद हॉस्पिटलच्या मागील अमरधामकडे जाणाऱ्या रोडवर फिरताना दिसल्याची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.तात्काळ योजना आखून पोलीस पथकाने संशयित ठिकाणी दबा धरला. संशयित इसम पोलिसांना दिसताच त्याला शिताफीने पकडण्यात आले.पकडलेल्या आरोपीला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. बोल्हेगाव अहिल्यानगर) असे सांगितले.त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की गावठी पिस्तूल ही ओमरत्न फुलकेश भिंगारदिवे (रा. वारुळाचा मारुती अहिल्यानगर) याच्याकडून ऑनलाइन पेमेंट करून विकत घेतलेली आहे. पोलिसांनी भिंगारदिवे यास ताब्यात घेतले व दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस अंमलदार सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी,विनोद बोरगे, वसीम पठाण,साबीर शेख, अविनाश वाघचौरे,विजय ठोंबरे, दीपक रोहकले,सत्यजित शिंदे, सुरज कदम,अभय कदम,अमोल गाडे,अतुल काजळे,शिरीष तरटे, अतुल कोतकर,सचिन लोळगे,राम हंडाळ,राहुल मासाळकर,संकेत धीवर,अतुल लाटे,अतुल शेंडे यांनी केली आहे.
