निलक्रांती चौक उजळला हजारो मेणबत्त्यांनी..!डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादनाची अभूतपूर्व प्रकाशक्रांती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निलक्रांती चौक येथे अभूतपूर्व आणि दिमाखदार कार्यक्रम पार पडला. आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक चौकात सकाळपासूनच विविध भागातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास विनम्र अभिवादन केले.सायंकाळी सात वाजता प्रभागातील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांसह हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत बुद्धवंदना घेऊन हजारो मेणबत्त्या पेटवत प्रकाशक्रांतीचे अनोखे व भक्तिमय रूप साकारले. निलक्रांती चौक संपूर्ण प्रकाशमय होऊन अविस्मरणीय दृश्य निर्माण झाले.

या कार्यक्रमाचे नेतृत्व शिव–फुले–शाहू–आंबेडकर–साठे चळवळीतील माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केले. उपस्थित माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,“ज्यांनी कोट्यवधी बहुजनांच्या अंधारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकला, त्या महामानवाला समर्पित अशा उदात्त भावनेतून हजारो मेणबत्त्या पेटवून हे अभिनव अभिवादन करण्यात आले.”कार्यक्रमादरम्यान विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. परिसरात *“जय भीम”, “बुद्धं शरणं गच्छामी”*च्या घोषणा घुमत होत्या.या प्रसंगी प्रभाग क्रमांक ९,गौतमनगर परिसरातील महेश भोसले, दयानंद साळवे, अरविंद साळवे, गणेश साळवे, सतीश साळवे, विक्रम शिंदे, सिंधुबाई सूर्यवंशी, शीलाताई वाघचौरे, छायाताई संभागळे, अनुराधाताई साळवे, संगीता शिंदे, संगीता भैलुमे, कोमल साळवे, शितल भालेराव, सुषमा साळवे, शीला कांबळे, संगीता मिसाळ, सविता कांबळे, राणी जाधव, शारदा पटेकर, माधुरी सोरटे, रेखा सोरटे, तेजस्वी साळवे, विमल पाचरणे, मंगलाताई साळवे, रिटाताई साळवे, प्रतिभा साळवे, रेखा मकासरे, हर्षा गायकवाड, विमल सोरटे, अस्मिता शिंदे, अंबिका साळवे, विधी साळवे, शुभम जाधव, राहुल साळवे, महेर मिसाळ, अक्षय वाघचौरे, गौरव वाघचौरे, तुषार बोराडे, प्रबुद्ध कांबळे, किरण पवार, तेजस पाचारणे, साहिल शेख, सोहेल सय्यद, विकास साळवे, प्रवीण भिंगारदिवे, अनिकेत साळवे, क्रिश साळवे, अमित घाटविसावे, रुपेश भोसले, भारत ठोंबे यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते.निलक्रांती चौकात झालेल्या या तेजोमय आणि श्रद्धापूर्ण अभिवादनामुळे वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले.महापरिनिर्वाण दिनानिमित्त साजरा झालेला हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
