महाराष्ट्रातील रक्ततुटवड्यावर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाची ‘रक्तक्रांती’..!चार दिवसांत ४ शिबिरे तब्बल २९९ रक्तपिशव्या संकलित..रक्तपेढीत उपलब्धता ४५० बॅगापर्यंत!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यभर ‘रक्तसंकट’ उद्भवले…फक्त दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा!कॉलेजांना सुट्या,रक्तदान शिबिरांचा अभाव आणि दिवाळीनंतर अचानक वाढलेली मागणी या सर्वांमुळे रक्तपेढ्या गंभीर अवस्थेत पोहोचल्या.याच संकटाच्या काळात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाने जबरदस्त पुढाकार घेत ‘रक्तक्रांती’ची मोहीम राबवली.विभागातील अधिकारी–कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, “रक्ततुटवडा भरून काढायचाच!असा निर्धार केला आणि सलग चार दिवस तब्बल ४ भव्य रक्तदान शिबिरांची यशस्वी अंमलबजावणी केली.
🩸✨ चार दिवस,चार शिबिरे, 299 रक्तपिशव्यांचा विक्रमी साठा!
१) 03 डिसेंबर 2025 — नगर कॉलेज रक्तदान शिबिर
महाविद्यालये नुकतीच सुरू झाल्याने पहिला संपर्क नगर कॉलेजला करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देत ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
२) 04 डिसेंबर 2025 — श्री दत्त जयंती विशेष रक्तदान शिबिर
प्रेमदान चौकातील दत्त मंदिर संस्थानच्या सहकार्याने दत्तजयंती निमित्त आयोजित भव्य शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
३) 05 डिसेंबर 2025 — कासार पिंपळगाव रक्तदान शिबिर
तिसऱ्याच दिवशी ग्रामीण भागात शिबिर घेत ५१ रक्तदात्यांनी जीवनदायी रक्तदान केले.
४) 06 डिसेंबर 2025 — महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष शिबिर
छत्रपती संभाजीनगर,भडकल गेट येथे महापरीनिर्वाण दिनानिमित्त अतिभव्य शिबिर या ठिकाणी लोकांनी विलक्षण उत्साह दाखवत तब्बल १५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे शिबीर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सलग चालले.
🔥 रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांची सेवा–तत्परता आदर्शवत!
रक्तपेढी विभागातील वैज्ञानिक अधिकारी व कर्मचारी यांनी या चार दिवसांमध्ये अक्षरशः १८–१८ तास ड्युटी करून शिबिरांसह रक्तपुरवठा व्यवस्थाही सुरळीत ठेवली.एकीकडे शिबिरे,दुसरीकडे २४ तास कार्यरत रक्तपेढी रुग्णसेवेत कोणतीही तडजोड नाही.आजच्या घडीला रक्तपेढीत ४५० ब्लड बॅगचा सुरक्षित साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला रक्तपुरवठ्यात अडचण येणार नाही,अशी खात्री विभागाने दिली आहे.
🙏 “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” — रक्तपेढी विभागाची नागरिकांना विनंती
रक्तपेढी विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,“एक पाऊल पुढे टाका… रक्तदान करा… जीव वाचा!”रक्तदान शिबिरे यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी–कर्मचाऱ्यांचे तसेच रक्तदात्यांचे वैज्ञानिक अधिकारी,रक्तपेढी विभाग जिल्हा रुग्णालय अधिकारी श्री.अमृत झांबरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
