“कुंभमेळ्यापूर्वी तपोवनात ‘विकास’ की ‘विनाश’? सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई ताठेंचा संताप उफाळला..🌳तपोवनातील वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये संतापाची लाट
नाशिक (प्रतिनिधी):-आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देत तपोवन परिसरात साधुग्रामसाठी मोठ्या प्रमाणावर जागा मोकळी करण्याचे काम सुरु झाले असून, शेकडो झाडांची तोड सुरू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वादळ उसळले आहे. पर्यावरणप्रेमी,स्थानिक नागरिक, काही सामाजिक संघटना यांनी या वृक्षतोडीवर जोरदार आक्षेप घेतला आहे.तर दुसरीकडे प्रशासन आणि काही राजकीय प्रतिनिधी याला कुंभमेळ्यासाठी आवश्यक प्रक्रिया असल्याचे सांगत आहेत.

विवेक फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई ताठे यांचा संताप “झाडे तोडणं म्हणजे आई–वडिलांवर हल्ला”
पर्यावरणविषयक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या लक्ष्मीताई ताठे यांनी तपोवनातील वृक्षतोड पाहून प्रशासनावर थेट निशाणा साधला.त्यांनी म्हटले,“झाडे तोडणे म्हणजे आई-वडिलांवर हल्ला करण्यासारखे आहे.कुंभमेळा होणारच आहे, पण त्यासाठी निसर्गाची कत्तल का?”त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून हजारो नागरिकांनी वृक्षतोडी विरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.
⚠️ राजकीय आरोप–प्रत्यारोपांना उधाण
वृक्षतोडीच्या निर्णयावरून राजकीय पक्ष एकमेकांवर तुटून पडले आहेत.काही नेत्यांचे म्हणणे,“कुंभमेळ्यासाठी साधुग्राम आवश्यक आहे,त्यामुळे नियोजनानुसार जागा मोकळी करणे भाग आहे.साधुग्रामच्या नावाखाली जमिनीचे मोल वाढवून भ्रष्टाचाराचे खेळ सुरू आहेत.या प्रकरणामुळे राज्यात विकास, पर्यावरण आणि राजकीय हितसंबंध यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
🌱 स्थानिकांची नाराजी — “तपोवनाचे अस्तित्व धोक्यात”
तपोवन परिसरातील रहिवासी, निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या वृक्षतोडीविरोधात तीव्र नाराजी नोंदवली.त्यांचे म्हणणे आहे की,“तपोवन हा नाशिकचा फुप्फुस आहे.झाडे तोडली तर इथे उष्णता वाढेल, पक्षी–प्राण्यांचे अधिवास नष्ट होतील.कुंभमेळा काही दिवसांचा आहे परंतु निसर्ग कायमचा आहे.या ठिकाणी झालेल्या चर्चेत व आंदोलनात शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे,विवेक फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताठे, आकाश पवार, कीर्ती ठाकूर, ज्योती शेलार इत्यादी उपस्थित होते.
