निंबळक येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी युवकाला शासनाची दिलासा देणारी मदत..!आ.काशिनाथ दाते यांच्या हस्ते ५ लाखांची आर्थिक मदत सुपूर्द..पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विशेष पाठपुरावा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील निंबळक परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकास महाराष्ट्र शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या राजवीर रामकिसन कोतकर याला शासनाकडून ५ लाख रुपयांची रोख आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून,ही मदत आज पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश स्वरूपात सुपूर्द करण्यात आली.या मदतीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विशेष पाठपुरावा करण्यात आला.त्यांच्या प्रयत्नांतून शासनाकडून ही मदत तातडीने मंजूर होऊन जखमी युवकाच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर तालुक्यातील निंबळक परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अशा परिस्थितीत शासनाने जखमी युवकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आर्थिक मदत दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी आमदार काशिनाथ दाते सर यांनी शासनाच्या वतीने मदत सुपूर्द करताना सांगितले की,वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना शासन सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी स्थानिक नागरिक ग्रामपंचायत सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
