सामाजिक कार्याचा राष्ट्रीय सन्मान..! ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई धोटे यांना प्रदान
नागपूर (प्रतिनिधी):-ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमच्या वतीने ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२५’नागपूर जिल्ह्यातील सुभाष नगर हिंगणा रोड येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई कुंदन धोटे यांना जाहीर करण्यात आला आहे.समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.सदर पुरस्कार हा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा, सामाजिक उत्थान,नवाचार तसेच समाज upliftment मध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात येत असून,तो उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व व उल्लेखनीय कार्याची अधिकृत मान्यता असल्याचे प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे.हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आदर्श समाजनिर्मितीसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आला आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या कार्याचा गौरव करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.सदरील संस्थेचे मुख्य कार्यालय कैलास नगर,मानेवाडा रोड,नागपूर येथे कार्यरत आहे.या राष्ट्रीय गौरव पुरस्कारामुळे समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळत असून,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक स्तरावर होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
