अंमळनेरमध्ये ‘कामाची पोचपावती’! प्रा.सविताताई संदानशिव यांचा अपक्ष असूनही सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय..अहिल्यानगरचे बंधू माजी नगरसेवक अजय साळवे यांचा जाहीर अभिनंदन संदेश..
अहिल्यानगर (दि.२१ डिसेंबर प्रतिनिधी):-महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून,जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत एक उल्लेखनीय निकाल समोर आला आहे.अंमळनेर नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ६ मधून प्रा. सविताताई योगीराज संदानशिव (साळवे) यांनी सलग दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून तब्बल एक हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत आपली लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.प्रा.सविताताई संदानशिव या अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी आरोग्य समिती सभापती आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे,तसेच डॉ. प्रशांत साळवे यांच्या बहीण आहेत.त्या अंमळनेर येथील प्रसिद्ध उद्योजक योगीराज संदानशिव यांच्या सुविद्य पत्नी असून,सामाजिक कार्य,शिक्षण क्षेत्र आणि नागरी प्रश्नांवरील ठाम भूमिका यासाठी त्या मतदारांमध्ये विशेष ओळखल्या जातात.
पहिल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत दुसऱ्यांदा विजयी केले.रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता, महिला व नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या प्रा.सविताताईंच्या कार्यशैलीला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.या विजयाबद्दल अहिल्यानगर येथील जेष्ठनेते अशोक गायकवाड,विजयराव भांबळ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे,अहिल्यानगर महानगरपालिकेचे जलअभियंता परिमल निकम,माजी उपप्राचार्य डी.आर.जाधव,सुनील क्षेत्रे,प्रा. भीमराव पगारे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.जयंत गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, अजय भिंगारदिवे सर,सुजय म्हस्के,सुशांत म्हस्के,रोहित आव्हाड,पत्रकार महेश भोसले,राहुल साळवे,चंद्रकांत वाघचौरे,गोविंद वाघचौरे, शशिकांत वाघचौरे,विवेक विधाते, बाजीराव भिंगारदिवे,किरण गायकवाड,विशाल गायकवाड यांच्यासह अंमळनेर व अहिल्यानगर येथील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या विजयामुळे अंमळनेर नगरपालिकेच्या राजकारणात प्रा. सविताताई संदानशिव यांचे स्थान अधिक भक्कम झाले असून, पुढील काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अधिक प्रभावी भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
