मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना ‘चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार’ प्रदान..खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग.ज.चितांबर विद्या मंदिर प्रशालेच्या कार्यक्षम व कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘शिक्षण महर्षी ग.ज.चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत दळवी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यावेळी व्यासपीठावर नव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, शिक्षकवृंद तसेच रोकडे कुटुंबीय उपस्थित होते.पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापिका विभावरी रोकडे म्हणाल्या की, “महर्षी ग. ज. चितांबर सरांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद असून संस्थेप्रती व शाळेप्रती मी कायम ऋणी आहे.”
यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील आठवणी, शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रशांत कुलकर्णी यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विभावरी रोकडे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
