निमगाव शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा तालुक्यात प्रथम क्रमांक
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा,निमगाव यांनी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.लहान गटात महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘सोंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण करत शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सदर कार्यक्रमाची अहिल्यानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे.तसेच तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत बालगटात शाळेची विद्यार्थिनी गौरी ज्ञानेश्वर धुळगंड (इयत्ता तिसरी) हिने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.‘सोंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथमेश त्रिभुवन, दिव्यम सचिन पवार, सार्थक झुराळे, पियुष जाधव, प्रिन्स पठारे, दिव्यम चंद्रकांत पवार, धनुष साबळे, यश कालंगडे, शुभम भागडे, विराज कालगंडे, कार्तिक आगलावे, यश आरणे, विश्वजीत कालंगडे, श्वेता मोरे, दिव्या काळे, अरीना शेख, श्रावणी जाधव, कीर्ती काकडे, समृद्धी खेमनर, आयमन आत्तार, आवेज शेख, विश्वराज गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या यशासाठी शिक्षिका मिना निकम, प्रतिभा तोरणे, सुधा गमे, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पंडित, पालक राहुल त्रिभुवन, शाहरुख सय्यद, दादासाहेब उंदरे, प्रेम त्रिभुवन यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या घवघवीत यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर, सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली महेंद्र साबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.निमगाव शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.
