प्रभाग ३ मधील प्रत्येक समस्या ही माझीच!जनतेसाठी आरपार लढ्याची गर्जना सौ.प्राप्ती संदीप चव्हाण यांचा जनतेला ठाम शब्द
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणे हाच माझा ध्यास असून प्रभाग क्रमांक ३ मधील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझी स्वतःची समस्या आहे आणि ती माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून सुटलीच पाहिजे,हाच माझा शब्द आहे,अशी ठाम भूमिका सौ.प्राप्ती संदीप चव्हाण यांनी व्यक्त केली.प्रभागात उद्भवणाऱ्या सापस्वच्छतेच्या तातडीच्या घटनांपासून ते गटार, स्वच्छता,मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर सौ.चव्हाण यांनी वेळोवेळी थेट हस्तक्षेप करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीवर भर देत त्यांनी प्रशासनातील त्रुटीं विरोधात सिस्टीमशी आरपार लढा देण्याची भूमिका घेतली आहे.
उतणार नाही, मातणार नाही,घेतला वसा टाकणार नाही या ब्रीदवाक्याप्रमाणे त्या सातत्याने जनतेच्या पाठीशी उभ्या राहत असून अन्याय,दुर्लक्ष आणि दिरंगाईविरोधात आवाज उठवत आहेत.सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी त्यांनी दाखवून दिली आहे.भारतीय जनता पार्टी मंडळ महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष असलेल्या सौ.प्राप्ती संदीप चव्हाण या जनतेच्या प्रश्नांवर ठाम,निर्भीड आणि संघर्षशील भूमिका घेत असल्याने प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षा अधिक दृढ होत आहेत.येणाऱ्या काळात जनतेने सारासार विचार करून निर्णय घ्यावा,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
