प्रभाग ६ मध्ये बोज्जा दांपत्याचा शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मधून माजी नगरसेविका सौ.वीणा श्रीनिवास बोज्जा यांनी ब व क गटातून,तर त्यांचे पती श्री.श्रीनिवास बोज्जा यांनी ड गटातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रणशिंग फुंकले आहे.समर्थक,कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बोज्जा दांपत्यावर विश्वास व्यक्त केला.प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी,मूलभूत सुविधा, नागरी समस्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार माजी नगरसेविका वीणा बोज्जा व श्रीनिवास बोज्जा यांनी यावेळी व्यक्त केला.
“जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; विकास हाच आमचा अजेंडा आहे,” असा ठाम शब्द त्यांनी दिला.या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये अशोक काळे काका,चंद्रकांत कोडम, दत्तात्रय रामगिरी, रामचंद्र जिंदम, चंद्रकांत बोज्जा, गणेश बिटला, राजू द्यावनपेल्ली, संजय बोज्जा, मोहन रच्चा, अशोक बिटला, सौ. कन्ना, सौ. अण्णलदास, श्रीमती बुरा काकू, भापकर काकू, सौ. सुनीता शिंदे, मनोज बोज्जा, विद्या रामगिरी, राणी बोज्जा, सरिता रामगिरी, रेखा जव्हेरी, सोनाली बोज्जा आदींचा समावेश होता.एकूणच, प्रभाग क्रमांक ६ मध्ये बोज्जा दांपत्याच्या उमेदवारीमुळे निवडणूक वातावरण तापू लागले असून, आगामी निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
