भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा पुढाकार..मोफत तपासणीसह नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला..एकाच छताखाली आरोग्यसेवेचा महासंगम..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डॉ.रोहन सांगळे आणि सचिन कराळे यांच्या वतीने दि.४ जानेवारी २०२६ रोजी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य हीच संपत्ती समजून आपल्या कुटुंबातील दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे भव्य मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिर
📅 वार – रविवार,४ जानेवारी २०२६
⏰ वेळ – सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत
📍 स्थळ – श्री स्वामी समर्थ क्लिनिक, शिवकृपा मेडिकल, इंद्रप्रस्थ कॉलनी नागरदेवळे बुऱ्हाणगर येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये नामांकित व तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. शिबिरात खालील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.
▪️डॉ. निलेश शेळके – स्त्रीरोग तज्ज्ञ (Gynecologist)
▪️डॉ. रोहन सांगळे – सर्वसाधारण तज्ज्ञ (General Physician)
▪️डॉ.अजिता शिंदे – नेत्र तज्ज्ञ (डोळ्यांचे डॉक्टर)
▪️डॉ. गणेश शिंदे – अस्थिरोग तज्ज्ञ (हाडांचे डॉक्टर)
▪️डॉ. उत्तम शिंदे – जनरल सर्जन (General Surgeon)
शिबिरामध्ये रुग्णांना विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, सविस्तर तपासणी तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तपासणी व निदानासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांनी आपली नाव नोंदणी संबंधित आयोजकांकडे करून या शिबिराचा लाभ घ्यावा. तपासणीसाठी येताना आपले जुने रिपोर्ट्स/कागदपत्रे (असल्यास) सोबत आणावीत.या आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ. रोहन सांगळे व सचिन कराळे (श्री स्वामी समर्थ क्लिनिक आणि शिवकृपा मेडिकल) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
