अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी भा.ज.पा.राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग क्र.५ च्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज भव्य शुभारंभ
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा शुक्रवार,दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा शुभारंभ सोहळा सिद्धार्थनगर येथील आण्णाभाऊ साठे चौकात होणार आहे.

“निधार विकासाचा, संकल्प विजयाचा!” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आमदार संग्रामभैय्या जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते प्रचाराचा औपचारिक प्रारंभ होणार आहे.
या निवडणुकीत भा.ज.पा.–राष्ट्रवादी युतीकडून
🔸 भोसले काजल गोरख (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष),
🔸 ॲड. धनंजय कृष्णा जाधव (भारतीय जनता पक्ष),
🔸 गंभीर हरजीतकौर जगजीतसिंग (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) व
🔸 मोहित प्रदीप पंजाबी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या प्रचार शुभारंभ सोहळ्याच्या माध्यमातून युतीकडून विकासाचा अजेंडा, नागरिकांच्या समस्या व शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.या कार्यक्रमास सर्व नागरिक,कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
