क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सेजल आधार निकेतनमध्ये प्रेरणादायी कार्यक्रम..सेजल आधार निकेतन हे केवळ आधार केंद्र नसून महिलांच्या हक्कांसाठी,अधिकारांसाठी आणि वंचित घटकांसाठी लढणारे महत्त्वाचे व्यासपीठ सामाजिक कार्यकर्त्या प्राप्ती चव्हाण
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शहरातील सेजल आधार निकेतन/गृह प्रतिकूल परिस्थितीतील महिलांचा हक्काचा निवारा येथे प्रेरणादायी आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मधील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या गोरगरिबांची जाण असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या प्राप्ती चव्हाण या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित महिलांशी संवाद साधताना प्राप्ती चव्हाण म्हणाल्या की, “सेजल आधार निकेतन हे केवळ आधार केंद्र नसून महिलांच्या हक्कांसाठी,अधिकारांसाठी आणि वंचित घटकांसाठी लढणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. समाजात दुर्लक्षित राहिलेल्या महिलांसाठी आधार देण्याचे काम हे केंद्र सातत्याने करत आहे,ही अभिमानाची बाब आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. आजही त्या विचारांची गरज समाजाला आहे.प्रत्येक स्त्रीने अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला न्याय देऊ शकते,या विश्वासातूनच समाजात परिवर्तन घडू शकते.”बालविवाह, सती प्रथा,आणि केशवपन यांसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा तसेच विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि सत्यशोधक समाजाची सावित्रीबाई फुलेंनी स्थापना केली.या कार्यक्रमात सेजल आधार निकेतन येथील समाजसेविकांनी आपल्या कार्याचा आढावा घेत महिलांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, हक्क मिळवून देण्यासाठी आणि संकटग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाचे उपस्थितांनी कौतुक केले.यावेळी उपस्थित महिलांनीही आपल्या समस्या आणि अनुभव मांडले.प्राप्ती चव्हाण यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी नेहमीच सहकार्य राहील,अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आला.यावेळी सेजल आधारनिकेतनच्या संचालिका अर्चना गणवीर मॅडम,वर्षा गायकवाड,मीनाताई खंडागळे,शोभाताई,कळसकर ताई, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा मध्ये हंसिका बोराडे, व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा मध्ये मध्ये स्वरा चव्हाण यांनी लक्ष वेधून घेतले होते.
