शिवसेनेचा रणशिंग फुंकला..प्रभाग १२ मधून चार दमदार उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ सोहळा..माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरातून सोमवार ५ जानेवारीला शक्तिप्रदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, येत्या सोमवार,दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिर परिसरातून भव्य प्रचार शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रचार शुभारंभ सोहळ्यातून शिवसेनेच्या चार अधिकृत उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे.प्रभाग क्रमांक १२ मधून चारही विद्यमान नगरसेवक पुन्हा रणांगणात उतरले असून मंगलाताई सुनील लोखंडे, सुरेखा संभाजी कदम,बाळासाहेब मारुती बोराटे आणि दत्तात्रय हरिभाऊ कावरे हे उमेदवार जनतेसमोर आपली भूमिका, विकासाचा अजेंडा व शिवसेनेची ताकद मांडणार आहेत.शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाखाली हे चारही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार या सोहळ्यात व्यक्त केला जाणार आहे. स्थानिक प्रश्न,मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येणार आहे.
या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी,स्थानिक नेते, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून, हा प्रचार शुभारंभ सोहळा शक्तीप्रदर्शन ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत, “धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा” असे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
