कै.विठ्ठल तरस यांचे स्मरणार्थ निमगाव शाळेस राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट..मिशन आपुलकी अंतर्गत निमगाव शाळेत उपक्रम
श्रीरामपूर (वार्ताहर):- अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत तालुक्यातील निमगाव प्राथमिक शाळेत नुकत्याच पार पडलेल्या पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस यांनी त्यांचे आजोबा कै.विठ्ठल वाघुजी तरस यांच्या सन्मानार्थ ६०००/-रुपयांच्या ३० राष्ट्रपुरुषांच्या दर्जेदार प्रतिमा भेट दिल्या.तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,शिक्षिका प्रतिभा तोरणे,सुधा गमे,मिना निकम या शिक्षकांनी वाढदिवसानिमित्त व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाळेस वृक्षारोपणासाठी झाडे व कुंड्या,ग्रंथालयासाठी पुस्तके तसेच शाळेच्या भौतिक सुविधांसाठी देणगीतून सुविधा पूर्ण होण्यासाठी मिशन आपुलकित सहभाग नोंदविला.शिक्षणप्रेमी पालक अमोल कालंगडे यांनी वृक्षारोपनासाठी दोन ट्रेलर माती उपलब्ध करून दिली.राधाबाई निमसे यांनी वृक्षारोपणासाठी एक हजर रुपयांची झाडे भेट दिली.सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पंडित व राहुल त्रिभुवन यांनीही मोलाचे सहकार्य केले.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी यावेळी शाळा विकासासाठी मिशन आपुलकी अंतर्गत सर्वांनी लोकसहभागातून शाळेस मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यात सर्वांचा निमगाव खैरीचे सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसरपंच विजयसिंग परदेशी,बाळासाहेब दुशिंग,महेंद्र साबळे,मोहन नानेकर,चंद्रकांत पवार आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास वेणुनाथ कालंगडे,संतोष भागडे,सोनाली साबळे,भिमाबाई जिवरख,राधाबाई निमसे,अर्चना जिवरख,जनाबाई धुळगंड,क्षितिजा परदेशी,योगिता तरस,पूजा कालंगडे,जयश्री भागडे,अंगणवाडी सेविका अनिता काजळे,अर्चना पंडित,बेबीताई ढोबळे, आरती सोनवणे,सोनाली रणनवरे,शोभा खरात,प्राजक्ता दुशिंग,कांचन दुशिंग,अनिता गजहंस,प्रियंका जाधव, मंगल त्रिभुवन,वर्षा पठारे,अनिता निमसे,छाया धुळगंड,हिना आत्तार,पुष्पा त्रिभुवन,सौ.सदाफळ,रोहित धुळगंड,मुबारख शेख,संजय त्रिभुवन,रमेश रोहोम,एजाज शेख,जावेद शेख,एकनाथ मोरे आदी पालक,ज्येष्ठ नागरिक,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
