केंद्रीय पोलीस दलात जुळ्या भावंडांची निवड देवगड विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-देवगड माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी पावसे सूरज राजेंद्र याची सीआयएसएफ आणि पावसे धिरज राजेंद्र याची सीआरपीएफ मध्ये या जुळ्या भावंडांची निवड झाली आहे. हि बाब विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.पावसे बंधू २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असून, त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर हे मोठे यश संपादन केल्याबद्दल देवगड विद्यालयाच्या वतीने सूरज पावसे आणि धीरज पावसे यांचे शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सत्कार आणि सन्मान करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभ्यासाबरोबरच क्रिडास्पर्धा व विविध उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता.शिस्त,राष्ट्रप्रेम,नेतृत्वगुण आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समतोल साधत त्यांनी आपली जडणघडण केली.शालेय,महाविद्यालयामध्ये देशसेवेची प्रेरणा अधिक दृढ झाली आणि त्याच प्रेरणेतून त्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले.यासाठी आवश्यक असणारा मैदानावरील सराव उपयुक्त ठरला.केंद्रीय राखीव पोलीस दल ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निमलष्करी दलाची संस्था असून, त्यात निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद बाब मानली जाते. कठोर लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या आणि मुलाखतींच्या अनेक टप्प्यांतून यशस्वीरीत्या मार्ग काढत सूरज पावसे आणि धीरज पावसे यांनी हे यश मिळवले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी गरीबीच्या परिस्थितीवर मात करून सातत्याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा आदर्श निर्माण केला.
देवगड विद्यालयाच्या मुख्यध्यापिका श्रीमती.उगले सुनंदा यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला. याप्रसंगी त्यांचे चुलते संदीप पावसे विद्यालयातील सहशिक्षक नेहे व्ही.आर,माने एम.ए, तातळे एस. एम.,राहाणे आर.बी. ,वाघ एस.डी ,थोरात डी.डी ,कुदळ ए.एस ,कातोरे सर,श्रीमती.वर्पे एस.डी ,शिरतार एस.एस ,पवार एस.बी ,भालेराव आर.ए. यांच्या सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
