हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी..संगमनेर तालुक्यात स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचे मोठे नेतृत्व उभे करू तालुकाप्रमुख अमर कतारी
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथे कॅनरा बँक चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अमर कतारी,युवा सेना जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण,संगमनेर शहराध्यक्ष रवींद्र कानकाटे, स्वाभिमानी संघटनेचे नेते नाना थोरात,सरपंच सुभाष गडाख,सेवानिवृत्त शिक्षक प्राध्यापक बाबुराव पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, शिवसेना तालुका उपप्रमुख भिमाशंकर पावसे, ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,त्रिंबक शिंदे वाघापूर शाखाध्यक्ष यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत,पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात मराठी तरुणांनी उद्योग व्यवसाय उभे करावेत असा दूरदृष्टीचा विचार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला.महाराष्ट्रातच मराठी माणसाला रोजगार,संरक्षण,स्वाभिमान मिळवून देण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.त्यांच्या विचाराचे मोठे नेतृत्व शिवसैनिकांच्या सहकार्याने संगमनेर तालुक्यात उभे करू असा विश्वास शिवसेना संगमनेर तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केला.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्राध्यापक बाबुराव पावसे आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला.त्यांनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स.१९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच स्व.बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे या क्षेत्रांतही काम करीत असत. इ.स.१९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. बाळासाहेब ठाकरेंनी जून १९, इ.स. १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.शिवसेनेचा पहिला मेळाव्यात ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. अशी माहिती बाबुराव पावसे यांनी दिली.
यावेळी संदीप पावसे, आप्पासाहेब गडाख,वसंत पावसे,अशोक पावसे,अशोक नेहे,संपत पावसे, भास्कर पावसे, रमेश पावसे, भाऊसाहेब पावसे,समाधान भालेराव,हरी जाधव,संदीप पावसे,भाऊराव जाधव,संजय पावसे,रामनाथ जाधव,सुखदेव पावसे,सुधाकर पावसे,अरुण नरवडे,बाबासाहेब पावसे,नाना पावसे,गेणु पावसे तुकाराम पावसे यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
