माघ पौर्णिमा यात्रा उत्सव अलोट गर्दीने देवगड फुलला..अश्वांच्या चित्त थरारक अदाकारी,तालबद्ध नृत्याने जनसमुदाय थक्क
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सर्वात मोठी देवगड खंडोबा माघ पौर्णिमा यात्रा प्रसिद्ध आहे.रविवारी अलोट गर्दी भंडारा, खोबऱ्याची उधळण करत भाविक भक्तांनी देवगड फुलला.येळकोट ! येळकोट ! जय मल्हार !! जयघोषाने भक्ती रसात देवगड परिसर न्हाऊन निघाला.सकाळी गावातून पारंपारिक संवाद्य काठी पालखी मिरवणुकीने यात्रेला उत्साहात सुरुवात झाली.तालुक्याचे आमदार अमोल खताळ,नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे,शेतकरी संघटनेचे नेते शरद थोरात यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.त्यानंतर राज्यभरात प्रसिद्ध असलेले अश्वप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाले.घुंगरूंच्या लयीत घोड्यांच्या लयबद्ध हालचाली, उंच उड्या मारणाऱ्या अश्वांच्या चित्त थरारक अदाकारी,तालबद्ध नृत्याने जनसमुदाय थक्क झाला.जिल्हापरिषद अहिल्यानगर,पंचायत समिती संगमनेर, देवगड अश्वसेवा संस्था व ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान(ब वर्ग) यात्रेनिमित्त भव्य अश्व बाजार, अश्व स्पर्धा तसेच पशू – पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले. अश्वप्रेमी,पशुपालक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी राज्यभरातून अश्व स्पर्धेसाठी जातिवंत अश्व दाखल झाले.ढोल–ताशे आणि डफाच्या तालांवर तसेच घुंगरूंच्या लयीत घोड्यांच्या लयबद्ध हालचाली दिसत होत्या. यावेळी उंच उड्या मारत,तसेच तालासोबत ठेका धरलेले घोडे त्यांच्या चित्त थरारक कला, अदाकारी,तालबद्ध नृत्य पाहून उपस्थित जनसमुदाय आश्चर्यचकित व मंत्रमुग्ध झाला.
तसेच पशुपक्ष प्रदर्शनात शेळ्या, बोकड व खिलारी,डांगी देशी विदेशी प्रजातीच्या बैल,गाय सहभागी झाले होते. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच जनावरांचे खरेदी विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवा करिता यावर्षी स्टॉलधारकांचे उत्कृष्ट नियोजन,गर्दीचे नियंत्रण,पार्किंग व्यवस्था,वाहतूक व्यवस्था यांचे उत्कृष्ट नियोजन तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन,श्री. क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट,यात्रा उत्सव समिती,ग्रामपंचायत हिवरगाव पावसा,देवगड अश्व सेवा संस्था व ग्रामस्थांनी केल्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला.देवगड अश्व प्रदर्शनाच्या उद्घाटन याप्रसंगी अहिल्यानगर पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त दशरथ दिघे,संगमनेर पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त पुंडलिक येवले,संगमनेर लघु पशु सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त भाऊसाहेब डौले,पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. प्रवीण सिनारे,अकोले पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अतुल पाटणे,महंत एकनाथ महाराज (अयोध्या), भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,देवगड अश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव,सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, भाऊसाहेब जाधव,केशव दवंगे,गणेश दवंगे,सोमनाथ भालेराव,सुधीर शेळके,मकरंद मुळे,मथाजी पावसे,नारायण पावसे,बाबुराव पावसे,कैलास दिवटे,वृक्षमित्र गणपत पावसे,गोरख पावसे,विनोद सूर्यवंशी,श्याम राहाणे,अण्णासाहेब काळे यांच्यासह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
