Politics शिवसेना (उबाठा) नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार व निर्धार बैठक..जिल्हा उपप्रमुखपदी अमर कतारी,तर तालुका प्रमुख भिमाशंकर पावसे,भाऊसाहेब हासे
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-शिर्डी लोकसभा अंतर्गत शिवसेना (उबाठा) अहिल्यानगर उत्तर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेनेचे आक्रमक व धडाडीचे नेतेअमर भाऊ कतारी यांची जिल्हा उपप्रमुख पदी (उत्तर),इम्तियाज शेख वाहतूक सेना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.तसेच संगमनेर तालुका प्रमुख पदी भिमाशंकर पावसे(पूर्व),तर भाऊसाहेब हासे (पश्चिम),योगेश खेमनर (विधानसभा प्रमुख),फैसल सय्यद शहर प्रमुख (दक्षिण),अमित चव्हाण शहर प्रमुख (उत्तर),रंगनाथ फटांगरे (उपजिल्हा संघटक),दीपक साळुंके (विधानसभा संघटक),अमित फटांगरे (मंडल प्रमुख बोटा विभाग),प्रकाश गायकवाड (मंडल प्रमुख आश्वी विभाग),बाळासाहेब घोडके (शहर समन्वयक),आसिफ तांबोळी (शहर संघटक),संजय फड (तालुका संघटक) या शिर्डी लोकसभा नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार व निर्धार बैठक शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दि ०७ रोजी दुपारी ०३ वाजता ठिकाण – शासकिय विश्रामगृह शिर्डी येथे खा.भाऊसाहेब वाकचौरे,जिल्हा प्रमुख सचिन कोते,जिल्हा प्रमुख जगदिश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या बैठकीस जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
