वर्धा प्रतिनिधी(गणेश हिवरे):-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या निवेदनातून गुंतवणूकदारांनी मागणी केली आहे की कोर्टाने जप्त केलेल्या मैत्रेय कंपनीची मालमतेचा त्वरित लिलाव प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूक दारांचा मोबदला वाटप करण्यात यावा या मागणीचे निवेदन दि.23 फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले. जिल्ह्यात बेरोजगारीने कळस गाठला त्यातच 2008 साली मैत्रेय प्लॉटरस अँड स्ट्रकचरस नावाची कंपनी वर्ध्यात दाखल झाली कंपनी कडून 12 ते चौदा टक्यांनी व्याज देण्यात येणार असून प्रतिनिधींना सुधा चांगले कमिशन देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले कंपनीच्या संचालिका एक महिला असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी यात लोकप्रतिनिधी बनून गरीब रोजमुजुर धुणीभांडी करणाऱ्यांना महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या प्रतिनिधी म्हणून काम करू लागल्या होत्या त्या मुळे त्यांच्या परिवाराचा उदर निर्वाह चालत होता परंतु 2014 साली भाजपाचे सरकार आले आणि 2016 साली सेबी कडून आक्षेप नोंदवत कंपनी बंद झाल्याचा आरोप गुंतवणूक दारान कडून होत आहे.परिणामी कंपनीत हजारो काम करणारे नागरिक बेरोजगार झाले असून रोजमजुरी,धुणीभांडी,शेतकरीवर्गाचे हजारो कोटी रुपये यात अडकून पडले,यामुळे नागरिकांनी मुलांच्या शिक्षणा करिता,लग्न सोहळा करिता तसेच वेळेवर मोठे काम आल्यास हा पैसा कामी येईल या आशेने नागरिकांनी कंपनीत पैसे टाकले होते परंतु कंपनी बंद होऊन 7 वर्षे लोटली परंतु अद्याप पर्यंत कंपनी कडून फुटकी कवडी सुधा मिळाली नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,कंपनीत पैसे अडकून पडल्याने गुंतवणूक दार यांचे कडून कंपनीत काम करण्याऱ्या महिला प्रतिनिधी यांना रोज अश्लील भाषेचा सामना सुधा करावा लागत आहे.माझे पैसे दे नाहीतर माझ्या घरी ये तुला उचलून नेणार या पेक्षाही अधिक खालच्या दर्जाची भाष्या गुंतवणूक दार वापरत असल्याचं आरोप महिला प्रतिनिधी कडून बोलल जात आहे या त्रासा पोटी काहींनी आत्महत्या केल्याचे सुधा सांगण्यात येत आहे,या करिता लोकप्रतिनिधी तथा शासनास वारंवार निवेदन देण्यात आले,परंतु केवळ खीली उडवण्याचा प्रकार केला जात आहे.वर्धा जिल्हाकरिता गोवा येथील 33 एकर जमीन व वर्धा कृष्णनगर येथील दोन माळयाची इमारत पोलिस प्रशासनकडून जप्त करण्यात आली असून पुढील (rcc) लिलावाची प्रक्रिया ही महसूल विभागाची असल्याचं पोलिस प्रशासनाकडून सांगितल्या जात आहे.सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याकडे कुणीही गंभीरतेने लक्ष देत नसल्याचं बोलल जात आहे कोर्टाकडून तारीख पे तारीख आणि नेत्यांकडून केवळ कोरडे आश्वासन दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप या वेळी दिसून येत होता त्यामुळे शासनास निवेदन देत तत्काळ लिलाव प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूक दारांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदनातून करण्यात आली असून.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले लिलावाची तत्काळ प्रक्रिया पूर्ण करून गुंतवणूकदारणा दिलासा देणारं का या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या वेळी कपंनीच्या महिला प्रतिनिधी लता जाधव,भावना दरणे,उर्मिला मेश्राम,रत्नमाला बुजाडे,गजानन हुलके,गणेश हिवरे,अरूनराव वरघने,संगीता कापटे,अनिता मेहर,गीता हातमारे, सुगंधा हटवार, वर्षा भोयर,ललिता शिदोडकर,सारिका ढाक,अर्चना मेटे,अंजू पराते,मीना कापटे,व असंख्य महिला भगिनी या वेळी उपस्थित होत्या.
