श्री एकनाथ भाऊ फाउंडेशनची महाराष्ट्रभर दमदार घोडदौड;पुणे शहराध्यक्षपदी अॅड. हक्कानी सर, मुंबई प्रभारीपदी तबरेज मन्सूर अन्सारी यांची नियुक्ती
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी (बिलाल कुरेशी):महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे कार्य वेगाने विस्तारत असलेल्या श्री एकनाथ भाऊ फाउंडेशनने संघटन विस्ताराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फाउंडेशनच्या वतीने पुणे शहराध्यक्षपदी अॅड. हक्कानी सर तर मुंबई प्रभारीपदी तबरेज अजीम मंसूरी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्रांचे वितरण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.यावेळी संस्थापक अध्यक्षा नाजनीन सय्यद, संस्थापक सचिव अजीम भाई शेख, प्रदेशाध्यक्ष अनवर भाई दुर्राणी तसेच फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात “गाव तेथे कार्यकर्ता, घर तेथे शिवसैनिक” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे संघटन मजबूत करण्याचे कार्य जोमाने करत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहत असून समाजसेवेची चळवळ अधिक बळकट होताना दिसत आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नावाने प्रेरित होऊन फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कार्यकर्त्यांच्या मते, समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन श्री. एकनाथ शिंदे यांनी संस्थेचे कौतुक करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्षा नाजनीन सय्यद, संस्थापक सचिव अजीम भाई शेख आणि प्रदेशाध्यक्ष अनवर भाई दुर्राणीभाई मुंबई कार्याध्यक्ष नवाब भाई गुल नेतृत्वाखाली राज्यभर समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे श्री एकनाथ भाऊ फाउंडेशनची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असून, महाराष्ट्रभर समाजसेवेचा आणि जनसंपर्काचा विस्तार आणखी वेगाने होईल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
