RPI नेते राजाभाऊ कापसे यांना कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेतृत्व हरवले- श्रीकांत भालेराव
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते राजाभाऊ कापसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पुणे येथे कामानिमित्त गेले असता अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तात्पूर्वीच त्यांचे निधन झाले.त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य सचिवपदाची जबाबदारी यशस्वीरित पार पाडली.ते प्रामुख्याने श्रीरामपूर आणि उत्तर महाराष्ट्र भागात सामाजिक व राजकीय कामकाजात सक्रिय व्यक्तिमत्व तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते.
अशा धडाडीच्या आक्रमक अन्यायाविरुद्ध न्यायासाठी लढणाऱ्या भीमयोद्धा दिवंगत राजाभाऊ कापसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य उपाध्यक्ष तथा कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी अर्पण केली. तसेच संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव, सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,मन्सूर इनामदार,अशोक भालेराव,
संजय भालेराव,राजेंद्र दारोळे, संदीप भालेराव,यादव भालेराव, कवी हरिश्चंद्र भालेराव,विलास कदम,रमेश दारोळे, रवींद्र दारोळे,शरद भालेराव,सुयोग भालेराव,भाऊसाहेब निळे, बाबासाहेब कदम,विजय निळे,विकास दारोळे,प्रल्हाद मोकळ,गौरव दारोळे,सगन भालेराव यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली.
