कराडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती जल्लोषात साजरी होणार;३० ऑगस्टला विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन!
कराड (प्रतिनिधी विजया माने):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रविवार,दि.३० ऑगस्ट रोजी कराड येथील सौ.वेणूताई चव्हाण सभागृहात भव्य आणि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा एकूण तीन सत्रांमध्ये रंगणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
तीन सत्रांतील कार्यक्रमांची रूपरेषा :
पहिले सत्र (दुपारी १२:०० वा.) – स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन :
या सत्रात सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखील पिंगळे आणि कराड उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक मा. राजश्री पाटील स्पर्धा परीक्षार्थींना बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत.
दुसरे सत्र (दुपारी २:०० वा.) – समाज प्रबोधन, सन्मान व पुस्तक प्रकाशन :
या सत्राचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होणार असून, जे.एन.यू. (नवी दिल्ली) चे डॉ. मिलिंद आव्हाड अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
या वेळी माजी सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण केले जाईल:
जीवनगौरव पुरस्कार : श्री. राजेंद्र केरकर (साहित्यिक व आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी, गोवा)
समाजगौरव पुरस्कार : सत्यभामा सौंदर्यमल, साहिल आरेकर, प्रितम हातेकर
प्रा. हरी नरके स्मृती साहित्य पुरस्कार : प्रा. डॉ. आनंद साठे
या सत्रात कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेशबाबा भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार असून, माजी संचालक (मेरा भारत युवा केंद्र) मा. कालिदास घाटवळ, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, युवा नेते वैभव थोरात, विजयसिंह यादव, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, गणेश पवार, पवन निकम व सुरेश आप्पा बडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद प्रा. सौ. जयमाला साठे भूषवणार आहेत.
तिसरे सत्र दुपारी ४:०० वा. – सांस्कृतिक व शाहिरी कार्यक्रम :
शाहीर रामानंद उगले यांचा ‘महाराष्ट्राची लोक गाणी’ हा बहारदार शाहिरी कार्यक्रम सादर होणार आहे.
या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, ॲड. संभाजीराव मोहिते, प्रमोद तोडकर, प्रविण काकडे, दत्ता भिसे, गजानन सकट, राम दाभाडे, रमेश सातपुते, डॉ. संजिव भोसले, सचिव हरिभाऊ बल्लाळ, प्रा. दिपाली वाघमारे, परशुराम साठे, आकाराम चव्हाण, उमेश कांबळे, मंगेश गायकवाड, सुरज घोलप, सचिन जगताप, राहुल वायदंडे, संजय थोरात, जगन्नाथ चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.
