देशभक्तीचा जल्लोष,लेझीमचा गजर अन् विद्यार्थ्यांवर बक्षिसांची लयलूट! निमगाव खैरी प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील निमगाव खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभात फेरीतील लेझीम पथकाचे सादरीकरण आणि गगनभेदी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता उंदरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांघिक कवायती, देशभक्तीपर गीते आणि मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार भाषणांनी ग्रामस्थांची मने जिंकली.या कौतुकास्पद कामगिरीवर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी तब्बल ७,००० रुपयांच्या रोख बक्षिसांची उधळण केली.
इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी दिव्यम सचिन पवार व दिव्यम चंद्रकांत पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास शेजुळ आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी मधुकर कदम यांनी शाळेच्या गरजेनुसार प्रत्येकी १० अशा एकूण २० खुर्च्या भेट दिल्या.कार्यक्रमास सरपंच दत्तात्रय झुराळे,उपसरपंच विजयसिंग परदेशी,मधुकर कदम,देवराम तुपे,मेजर अप्पासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष बत्तीसे,भाऊसाहेब पंडित, पूजा कालंगडे,ग्रामसेवक सुधीर उंडे,तलाठी कर्जुले बी.ए.रेवणनाथ झुराळे, दत्तात्रय सगम,भाऊसाहेब शेजुळ,सुजित भागडे,गणेश भाकरे,उमाकांत तांबे,दत्तू बत्तीसे,तुळशीराम पवार, बाळासाहेब दुशिंग,बाबासाहेब दुशिंग,बन्सी चोखर, भाऊसाहेब कालंगडे, भामाबाई धुळगंड,आशाबाई चौधरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना निकम यांनी केले,तर उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी केले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्षा सोनाली साबळे,शिक्षिका प्रतिभा तोरणे,सुधा गमे,जयश्री दिवटे, चंद्रशेखर गाढे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी सुधा गमे यांनी आभार मानले.
