पैशांच्या पावसाचं भयानक गुपित उघड..! बंद खोलीत जिन्याखाली सापडल्या 18 हजार बनावट नोटा;1 कोटींच्या मुद्देमालासह LCB ने तिघांना ठोकल्या बेड्या,पाहा थरार..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी हद्दीतील विनायक कॉलनी येथे छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपये दराच्या तब्बल १८,४१९ बनावट नोटा (किंमत ९२ लाख ९ हजार ५०० रुपये), ५ मोबाईल आणि व्हॉक्सवॅगन कार (MH-14-DF-0365) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत पोलिसांनी गणेश दिलीप शेवाळे (वय ३३,रा. अशोकनगर,बारामती,जि. पुणे),सुमित विकास चंदनशिवे (वय २५,रा.तांदुळवाडी, बारामती,जि.पुणे),सुरज वसंत कांबळे (वय २७,रा. झारगडवाडी,बारामती,जि. पुणे) तिघांना अटक केली आहे.चौकशीत गणेश शेवाळे याने या बनावट नोटा साथीदार प्रताप धुमाळ (रा.बोल्हेगाव, अहिल्यानगर फरार) व अशोक भिमराज दारकुंडे (रा.गजानन कॉलनी,एमआयडीसी, अहिल्यानगर फरार) यांच्या मदतीने मालेगाव येथील अम्मु (रा.मालेगाव – फरार) याच्याकडून अवघ्या २५ हजारांत आणल्याची कबुली दिली.आरोपी नागरिकांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अंधश्रद्धेतून लूट करत होते.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात BNS कलम १७९, १८०, ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि संदीप दरवडे,पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,गणेश लोंढे,शाहीद शेख,संदीप पवार, विष्णू भागवत,सुयोग सुपेकर, संतोष खैरे,बाळासाहेब गुंजाळ,फुरकान शेख,प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
