“फक्त एकदा भेटूया…आणि होत्याचं नव्हतं झालं..! ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करताच धक्कादायक सत्य आले समोर..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर ओळख निर्माण करून भेटण्यासाठी बोलावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.फिर्यादी आदेश नंदकुमार चेमटे यांना सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून तीन इसमांनी भेटण्यास बोलावले. त्यानंतर मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी साहिल युवराज ससाणे,आकाश सुरदेव लोंढे व ओंकार भरत बाय यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेले मोटारसायकल व तीन मोबाईल असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.हेमंत थोरात,पीएसआय.अजय कोटे, पोलीस अंमलदार राकेश खेडकर,शैलेश रोहकले, बापूसाहेब फ़ोलाणे,देविदास खेडकर,राजू सुद्रिक,दीपक फुंदे,नवनाथ दहिफळे,किशोर जाधव,संपत खेडकर,राहुल गुंडू,अरुण सांगळे यांनी केली.
