स्थानिक गुन्हे शाखेचे ‘ऑपरेशन क्लीन’..! १५ ऑगस्ट रोजी गुटखा तस्करांना दणका;एकाच दिवशी ६ छापे, १६ जणांवर थेट गुन्हे दाखल!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गुटखा माफियांचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त करत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला.नेवासा,सुपा आणि पारनेर परिसरातील अवैध अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी १ लाख ३७ हजार ५८० रुपयांचा प्रतिबंधित मावा,पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशाने झालेल्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली ४ विशेष पथके तयार करून एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
💥गुन्हे आणि आरोपींची सविस्तर यादी
नेवासा पोलीस ठाणे:
गु.र.नं. ६८७/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५) | जप्त मुद्देमाल: ₹११,२००/-
👉 आरोपी: अल्ताफ सुभानभाई शेख (वय ३९, रा. गळनिंब)
गु.र.नं. ६८८/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५) | जप्त मुद्देमाल: ₹१६,०००/-
👉 आरोपी: कानिफनाथ कर्नासाहेब तुवर (वय २६, रा. पाचेगाव)
गु.र.नं. ६८९/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५) | जप्त मुद्देमाल: ₹६४,०००/-
👉 आरोपी: १) विधिसंघर्षित बालक (वय १६), २) अस्लम गणीभाई तांबाळो (फरार, दोघे रा. पाचेगाव)
सुपा पोलीस ठाणे:
गु.र.नं. २७५/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५) | जप्त मुद्देमाल: ₹२३,०७०/-
👉 आरोपी: १) शहाजी छबन काळे (वय ४६, रा. म्हसणे), २) योगेश दत्तात्रय पवार (वय २१, रा. सुपा), ३) बबन बांडे (रा. टाकळी ढोकेश्वर)
पारनेर पोलीस ठाणे:
गु.र.नं. ६१९/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५, ३(५)) | जप्त मुद्देमाल: ₹८,७३८/-
👉 आरोपी: १) रोहिदास जगन्नाथ कोयते (वय ३६), २) फिरोज चाँद इनामदार (वय ४८), ३) आबिदा चाँद इनामदार (फरार, तिघे रा. जवळा), ४) मनोहर बडे (फरार, रा. गणोरे), ५) मुन्नाभाई (फरार, रा. निघोज)
गु.र.नं. ६२०/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५, ३(५)) | जप्त मुद्देमाल: ₹१४,५७२/-
👉 आरोपी: १) अविनाश बाळासाहेब लंघे (वय ३२, रा. निघोज), २) विशाल तुकाराम गाडीलकर (वय २७, रा. गाडीलकरवस्ती, निघोज), ३) रोहित पंढरीनाथ कोल्हे (वय ३०, रा. निघोज), ४) सत्यम वरखेडे (फरार, रा. निघोज)
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप दरवडे,अनंत सालगुडे,अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,अशोक लिपणे, सुनिल मालणकर,भगवान थोरात,रमीझराजा आतार, अतुल लोटके,विजय ठोंबरे, संदीप पवार,किशोर शिरसाठ, योगेश भिंगारदिवे,विष्णु पवार, शाहीद शेख,सागर ससाणे, प्रकाश मांडगे,निळकंठ कारखेले,सोमनाथ झांबरे, बिरप्पा करमल आणि अमोल आजबे यांनी केली.
