तथागतांचा ‘प्रतीत्यसमुत्पाद’ हाच मानवी जीवनाचा खरा मार्गदर्शक दीपस्तंभ! भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावास प्रवचन मालेचे ८ वे पुष्प वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (अहिल्यानगर शहर शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वर्षावास प्रवचन मालिका २०२६’ अंतर्गत ८ वे प्रवचन पुष्प वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आयु. योगेश साठे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात गुंफण्यात आले.याप्रसंगी प्रमुख प्रवचनकार म्हणून उपस्थित असलेले ख्यातनाम बौद्धाचार्य दीपक अमृत यांनी ‘तथागत गौतम बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल प्रबोधन करून उपस्थितांना बौद्ध धम्माची जीवनमूल्ये विशद केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु.राजेंद्र साळवे सर यांनी केले.बौद्धाचार्य दीपक अमृत यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून कार्य-कारण भावाचा सिद्धांत समजावून सांगताना मानवी दुःखमुक्तीसाठी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची प्रासंगिकता स्पष्ट केली. महिला जिल्हाध्यक्षा आयु. सुनिताताई गायकवाड यांनी वर्षावासाचे महत्त्व,त्यामागील इतिहास आणि दैनंदिन जीवनातील त्याचे स्थान यावर प्रकाश टाकला.शहराध्यक्ष आयु.दीपक पाटोळे यांनी ‘धम्मातील श्रद्धा व विवेक’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.शहर सरचिटणीस आयु.लक्ष्मण माघाडे यांनी ‘उपोसथ व्रत आणि त्याचे मानसिक व सामाजिक फायदे’ यावर मार्गदर्शन केले.या मंगलप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि साठे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई गायकवाड, शहराध्यक्ष दीपक पाटोळे, जिल्हा कार्यालयीन सचिव गौतम पाचारणे,प्रचार व पर्यटन सचिव रवींद्र कांबळे, महिला कार्यालयीन सचिव सिंधुताई साळवे,सचिव रेखाताई भिंगारदिवे,शहर सरचिटणीस लक्ष्मण माघाडे, कोषाध्यक्ष विजय चाबुकस्वार, संस्कार उपाध्यक्ष युवराज बनसोड,प्रचार-पर्यटन उपाध्यक्ष मोहन शिरसाट, कार्य.सचिव विजय पाटोळे, संघटक राजेंद्र थोरात,भिंगार वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष जनार्दन दिवे,यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे,वंदना साठे,प्रेम साठे, प्रतिक साठे,इंजि.अरविंद जाधव,रूपाली जाधव,सुनील संसारे (मामा),संदीप सोनवणे, प्रतिक जाधव,प्रज्ञा जाधव, इंजि.सुगंधराव जाधव (मामा), प्रमोद आढाव,अक्षय भालेराव, गोविंद ससाणे,देविदास यांच्यासह अनेक उपासक-उपासिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी सचिव रेखाताई भिंगारदिवे यांनी साठे परिवाराचे आयोजनाबद्दल आभार मानले, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या शहर,महिला व जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
