बायपास टोलनाक्यावर धारदार कोयत्याने दहशत माजवणारे ताब्यात ! कोतवाली पोलिसांची थरारक झडप दोघांच्या आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील कल्याण बायपास ते पुणे बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ हातात धारदार लोखंडी कोयता बाळगून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या दोन गुन्हेगारांचा माज कोतवाली पोलिसांनी काही क्षणांत उतरवला आहे.गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाइल सापळा रचून या दोघांना जागीच बेड्या ठोकल्या असून,त्यांच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे.१६ ऑगस्ट २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख व अंमलदार पेट्रोलिंग करत होते.दरम्यान, पोलीस निरीक्षक नितिन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ दोन तरुण हातात धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत पसरवत आहेत.
माहिती मिळताच पथकाने तातडीने कल्याण बायपास चौक ते पुणे बायपास चौक परिसरात धाव घेतली.तेथे संशयितरित्या दहशत माजवत असलेल्या प्रितिम भाऊसाहेब लाळगे (वय २४ वर्षे, रा. दांगटमळा,चेतना कॉलनी, नवनागापूर, वडगाव गुप्ता,ता. जि. अहिल्यानगर) व
नकुल विठ्ठल पवार (वय २६ वर्षे,रा.जेऊर बायजाबाई न्हावी गल्ली,ता.जि.अहिल्यानगर) या दोघांना पोलिसांनी शिताफीने घेरून ताब्यात घेतले.पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजेंद्र लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक नितिन देशमुख,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड,राहुल शिंदे,विनोद बोरगे, शाबीर शेख,विशाल दळवी,मपो.रोहिणी दरंदले,अतुल काजळे,दिपक रोहकले,अमोल गाडे, शिरीष तरटे,रमेश शिंदे,संकेत धिवर,अतुल लाटे,दत्तात्रय कोतकर,सुरज कदम,सचिन लोळगे,सत्यम शिंदे,महेश पवार,शरद धायगुडे,फैजल शेख आणि मपो.पल्लवी रोहकले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
