शहरातील ‘त्या’ अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई..मुक्या जिवांच्या रक्ताने माखलेले हात अखेर LCB च्या बेड्यांमध्ये..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-अहिल्यानगर शहरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठला परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईत १६० किलो गोमांसासह लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.कैफ शब्बीर कुरेशी (वय ४७ वर्षे,रा.नालबंद खुंट, अहिल्यानगर),मतीन ख्वॉजामिया कुरेशी (वय ५० वर्षे,रा.हमालवाडा,झेंडीगेट, अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून चाकू, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व गोमांसह ८३,५०० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७०३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५(क) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार शाहीद शेख,योगेश भिंगारदिवे,राहुल द्वारके, सोमनाथ झांबरे,सागर ससाणे, भाग्यश्री भिटे व सुनिता पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
