जिल्ह्यात LCB च्या धडक कारवाया सुरुच..तब्बल ११ ठिकाणी छापे..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्या पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे यांच्यासह तीन पथके तयार करण्यात आली.या पथकांनी १८ ऑगस्ट रोजी संगमनेर शहर,नेवासा आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई केली.
विविध ११ ठिकाणी छापे टाकून जुगार व अवैध दारूविक्रीप्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत ४४ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संगमनेर शहरात जुगार व दारू विरोधात ४ कारवाया,नेवासा येथे दारूविरोधात १,तर श्रीरामपूर तालुका हद्दीत जुगाराच्या ४ आणि दारूच्या २ कारवाया करण्यात आल्या.LCB च्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री संतोष मुटकुळे,पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले,सोमनाथ झांबरे, राहुल डोके,बाळासाहेब गुंजाळ,रणजीत जाधव,सुनिल मालणकर,भगवान धुळे,बाळासाहेब नागरगोजे, भगवान सानप,आजिनाथ पाखरे,किशोर शिरसाठ, महादेव भांड,राहुल द्वारके, शाहीद शेख,अभिजीत अरकल,अरूण गांगुर्डे,अशोक लिपणे व योगेश कर्डीले यांनी केली आहे.
