कर्तव्यदक्ष कामकाजाची पावती!सचिन तायडे यांची मनपा अधीक्षकपदी पदोन्नती; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जंगी सत्कार..!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वार्ड (ड) कार्यालयातील कर्तव्यदक्ष व कार्यक्षम वरिष्ठ लिपिक सचिन तायडे यांची अधीक्षक (Superintendent) या वरिष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल प्रशासकीय वर्तुळात तसेच सामाजिक क्षेत्रातून मोठे कौतुक होत असून,‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सचिन तायडे यांनी महानगरपालिकेत सेवा बजावताना नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्परतेने मार्गी लावले असून आपल्या कामातून एक वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या प्रामाणिक व सातत्यपूर्ण सेवेची दखल घेत प्रशासनाकडून त्यांना अधीक्षकपदी बढती देण्यात आली.
या पदोन्नतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक/प्रमुख राजू भाई साबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी पक्षाचे सहसचिव वैभव लोखंडे, चंद्रकिशोर दाभाडे,फईम शेख यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सचिन तायडे यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून त्यांचा यथोचित गौरव केला.”नवीन जबाबदारीच्या माध्यमातून तायडे हे जनसामान्यांच्या हिताचे काम अधिक जोमाने करतील,” असा विश्वास राजू भाई साबळे यांनी यावेळी व्यक्त केला.या सत्कारामुळे सचिन तायडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
